Marathi FM Radio
Monday, January 19, 2026

आलापिनी जोशी यांना ‌‘गानवर्धन‌’चा संगीतसंवर्धक पुरस्कार !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

आलापिनी जोशी यांना ‌‘गानवर्धन‌’चा संगीतसंवर्धक पुरस्कार !

पुणे : गानवर्धन संस्थेचे संस्थापक कै. कृ. गो. धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या संगीतसंवर्धक पुरस्कारासाठी कराड येथील स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या संचालिका आलापिनी जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisement


शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य या तीनही क्षेत्रात गेली 48 वर्षे गानवर्धन संस्था कार्यरत आहे. शास्त्रीय संगीतामध्ये ज्ञानदान व प्रसाराचे काम करणाऱ्या कलाकारास संस्थेच्या वतीने संगीतसंवर्धक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. अमेरिकास्थित सुधीर धर्माधिकारी आणि सविता हर्षे हे पुस्काराचे प्रायोजक आहेत.

Advertisement

मातोश्री कै. स्वरगंधा टिळक यांनी स्थापन केलेल्या स्वरनिर्झर संस्थेच्या माध्यमातून आलापिनी जोशी गेली 25 वर्षे संस्थेच्या संचालिका म्हणून काम पाहात आहेत. आलापिनी जोशी यांच्या सांगीतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

Advertisement


पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजता भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गुरू व विचारवंत माधुरी डोंगरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि 21 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Advertisement

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आलापिनी जोशी यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले असून समीर मोडक (तबला), मीनल नांदेडकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular