गोल्डन आय न्यूज नेटवर्क
दि. ०४ नोव्हेंबर २००४ रोजी झालेल्या रामरक्षेवरील प्रवचनात “सीता शक्ति:” ह्या रामरक्षेतील प्रारंभिक चरणातील पाचव्या ओळीचा विस्तारपूर्वक अर्थ सांगताना सद्गुरु अनिरुद्ध बापू, आमच्या जीवनात सीतेचे स्थान काय, श्रीरामाचे स्थान काय, रावण म्हणजे नक्की कोण आणि ह्या रावणाला जन्म देणारी कैकसी म्हणजे काय, हे उलगडून सांगतात. तसेच ह्या सीतेला आमच्या जीवनातील रामापासून रावण कसा दूर करतो, हेदेखील सद्गुरु बापू इथे विस्तृतपणे सांगतात.
त्याचबरोबर, सीता कशाची शक्ती आहे व ही शक्ती आम्हाला काय प्राप्त करून देते? आणि ह्या शक्तीशी निगडित विश्वातील सगळ्यात मोठे रहस्य कोणते? ह्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊन सद्गुरु बापू आम्हाला रामरक्षा स्तोत्रमंत्र पठणाचे महत्त्व केवळ आध्यात्मिकदृष्ट्याच नव्हे, तर वैज्ञानिक व वैद्यकीय दृष्ट्याही समर्पकपणे समजावून सांगतात.