गोल्डन आय न्यूज नेटवर्क
प्रदीप चंद्रचूड लिखित ‘गीता अनुभूती’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन !!
पुणे : प्रदीप चंद्रचूड लिखित आणि उत्कर्ष प्रकाशन प्रकाशित ‘गीता अनुभूती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. 15 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता मुकुंदराव पणशीकर सभागृह, 34/2, सेवा भवन, एरंडवणे पुणे येथे होणार आहे.
पुस्तकाचे प्रकाशन दासबोधाचे अभ्यासक, प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट डॉ. राम साठ्ये यांच्या हस्ते होणार असून पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, स्वरूपयोग प्रतिष्ठानचे डॉ. हिमांशु वझे, गीता अभ्यासक डॉ. अनुराधा कुलकर्णी, प्रकाशक सुधाकर जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती दीप्ती चंद्रचूड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.