गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*पुण्यनगरीत श्री विश्वकर्मा जयंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न*!!
पुणेः-(प्रतिनिधी) येथील विश्वकर्मा युवा फाउंडेशन च्या वतीने “श्री विश्वकर्मा जयंती “मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात श्री विश्वकर्मा एकदंडीगी मठ ,यादगिरी गुलबर्गी हुमानाबाद बसवकल्याणचे पिठाधीस परम पूज्य श्री श्री श्री श्रीनिवासजी महास्वामीजी यांच्या धार्मिक विधीवत मार्गदर्शना खाली मोठ्या उत्साहात भक्तीमाय वातावरणात संपन्न झाला.
गेल्या आठ वर्षा पासुन विश्वकर्मा युवा फाउंडेशन सुतार ,सोनार,लोहार,कांस्य कारागीर(तांबटकर),कुंभार(मुर्तिकार)इत्यादी जातीच्या समाजाचे एकत्रीकरण व सशक्तीकरण हाच ध्यास घेऊन नियोजन पध्दतीने कार्य करीत आहे.
पुण्यनगरीतील धायरी येथील धायरेश्वर मंदीर परिसरातील श्री स्वामी समर्थ हाॕल येथे प्रभु विश्वकर्मा यांची पुजा ,होमहवन,आरती आदी धार्मिक विधी मंत्रोच्चार उत्साहात संपन्न झाले.व्यासपीठावर प्रामुख्याने प्रसिध्द व्याख्याते निलेश रमेश भिसे यांनी प्रभु श्री विश्वकर्मा व शिव व्याख्यान प्रभावी शैलीतुन केले.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ,रुपालीताई चाकणकर यांनी महिला सशक्तिकरणावर याप्रसंगी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर किशोरभाऊ पोकळे,सुरेश भालेराव,,सुरेश भालेराव,राजेश नागपुरे ,हनुमंतराव पांचाळ,भुपेंद्र मोरे,योगेश शेलार,खुशिलाल शर्मा ,शत्रुघ्न शर्मा,सौ.अमृता दिपक देगावकर,अरुण माने,सिध्दार्थ टिंगरे,आदी मान्यवरांनी भगवान विश्वकर्मा यांचे मंदीर उभारणीसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन मनोगत व्यक्त करतांना दिले.व विश्वकर्मा युवा फाउंडेशन च्या पदाधिकारी यांनी उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन अभिनंदन केले.
कार्यक्रमात प्रामुख्याने प्रसिध्द पत्रकार आत्माराम ढेकळै ,जयंत पोलस्ते,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष दिक्षीतआदी गुणवंताचा युवा फाउंडेशनच्या वतीने सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात सुवर्णपदक विजेती ,राष्ट्रीय कराटे चॕम्पियन सहा वर्षाची चिमुकली कु.आद्या सचिन घोडके चे कौतुक सौ.रुपालीताई चाकणकर यांनी करुन हिच्या प्राविण्या बद्दल सन्मानपत्र व बक्षीस त्यांच्या हस्ते देण्यात देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन सौ,शुभदाताई धामापुरकर यांनी प्रभावशाली शैलीतुन केले.याच कार्यक्रमा अंतर्गत आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.८० लोकाःची नेत्र तपासणी करण्यात आली व त्यात ५० लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.तसेच ८रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वकर्मा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पिनप्रतिवार,सचिव नागेश पांचाळ,किशोर धातुजवार,विष्णुकांत पोतदार,विजय पांचाळ ,राजु पांचाळ,अजय पोतदार,गणेश पांचाळ,विकास विसपुते व सर्व कार्यकारी मंडळ ,सामाजिक कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.