गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘सुरोत्सव’ दिपावली पहाट संगीत मैफल शुक्रवारी !!
पुणे : धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान व डी. एस. के. विश्व गणेश मंडळातर्फे ‘सुरोत्सव’ दीपावली पहाट संगीत मैफलीचे शुक्रवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी 6 वाजता डी. एस. के. विश्व, मार्केटिंग ऑफिस जवळ, धायरी येथे होणार आहे.
मैफलीत किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित यादवराज फड व प्रसिद्ध गायिका डॉ. वृषाली देशमुख यांचा सहभाग असणार आहे. मैफलीत शास्त्रीय गायनाबरोबरच अभंगवाणी, नाट्यगीत, भक्तीसंगीत, भावगीते सादर केली जाणार आहेत.
त्यांना अविनाश पाटील (तबला), आसाराम साबळे, (पखावज), आशिष कदम (की बोर्ड), संजय गोगटे (संवादिनी), शिवाजी डाके (ताल वाद्य) हे साथ संगत करणार आहेत. नीरजा आपटीकर यांचे निवेदन आहे.
मैफल सर्वांना विनामूल्य आहे.
__________________________________________
जाहिरात