गोल्डन आय न्युज नेटवर्क
‘सप्रेम’तर्फे गुरुवारी एकल संवादिनी वादन !!
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणे अंतर्गत असलेल्या संवादिनी प्रेमी मंडळातर्फे (सप्रेम) संवादिनी वादनाची विशेष मैफल गुरुवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
मैफल सायंकाळी 6:30 वाजता गांधर्व महाविद्यालय, पुणे येथील विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे. यात गोवा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित राया कोरगावकर आणि बंगळुरू येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित रवींद्र कातोटी यांचे एकल संवादिनी वादन होणार असून कलाकारांना तेजस कातोटी संवादिनी तर ऋषिकेश जगताप, तुकाराम गोवेकर तबला साथ करणार आहेत, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदानाद्वारे कळविली आहे.
प्रसिद्ध उद्योजक संजय चितळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
शुक्रवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळात पंडित रवींद्र कातोटी यांची संवादिनी स्वतंत्र वादन तंत्र आणि मंत्र याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
__________________________________________
जाहिरात