गोल्डन आय न्युज नेटवर्क
दिलीप महतकर यांचा नवरत्न पुरस्काराने सन्मान !
Pune :.अध्यक्ष, ‘दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्य’, नाना जगन्नाथ शंकरशेठ प्रतीष्ठानचे सल्लागार तसेच ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे कोषाध्यक्ष, दिलीप रामचंद्र महतकर यांना ना. नाना जगन्नाथ शंकरशेठ पुण्यतिथी कार्यक्रमांतर्गत ‘नवरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष, समाज श्रेष्ठी मा.डॉ.श्री गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट वतीने प्रदान करण्यात आला.
गेल्या 35 वर्षापासून श्री दिलीप महतकर समाज कल्याणासाठी विविध योजना यशस्वीपणे राबवत आहेत.
या प्रसंगी अध्यक्षांनी सांगितले की दिलीप महातकर ह्याच्या सारख्या ज्येष्ठ, विचारी, निस्वार्थी समाजश्रेष्ठींचा सोनार समाजाला सार्थ अभिमान आहे व त्याचा नवरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आमच्या संस्थेला आनंद होत आहे !
समाज भूषण मा. दिलीप रामचंद्र महतकर यांना नवरत्न पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आल्याबद्दल वंशावळी डॉट कॉम (vanshavaly.com), सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतुबंधन मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना तसेच दैवज्ञ सोनार समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
__________________________________________
जाहिरात