गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संगीताच्या जादूगाराला गायकांचे हटके अभिवादन !
हटके म्युझिक ग्रुपच्या वतीने संगीतकार आर .डी .बर्मन यांच्या प्रसिद्ध रचनांचे सांगीतिक कार्यक्रमात सादरीकरण !!
पुणे : संगीताच्या जादूगाराला गायकांचे ‘हटके’ कुर्निसात / सलामी
संगीतातील अभिजात नवनिर्मिती करणारे दिग्दर्शक राहुल देव (R D) बर्मन – ज्यांना सर्व प्रेमाने पंचम असे प्रेमाने ओळखतात, त्यांना हटके ग्रुप येत्या २० तारखेला आगळी वेगळी सांगीतिक सलामी देत आहे.
आजचे आघाडीचे गायक कलाकार जितेंद्र भुरूक (जे व्हॉइस ऑफ किशोर म्हणून ओळखले जातात), प्रभावी गायिका राधिका अत्रे आणिक जगविख्यात वाद्यवृंदाबरोबर, हटके म्युझिक ग्रुप चे कलाकार पंचमदांची यांची अनेकविध प्रचलित आणि प्रसिद्ध गाणी पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिर येथे रात्रौ ९.३० वा सादर करणार आहे. असाच कार्यक्रम हटके ग्रुप ने २८ एप्रिलला गणेश हॉल मध्ये सादर केला होता आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता.
हटके म्युझिक ग्रुप हा नवीन नवीन संकल्पना घेऊन असे कार्यक्रम श्रोत्यांसमोर गेले ५ वर्षे आणत आहे, हा त्यांचा ७५ वा हीरक महोत्सवी कार्यक्रम आहे. नवोदितांना संधी, नवनवीन कार्यक्रमाची निर्मिती आणि सांगीतिक व्यावसायिकांना चलती असे या ग्रुप चे ब्रीद आहे. हटके कलाकार आपापल्या व्यवसाय, जीवन कारकीर्द यांत प्राविण्य मिळवत आपली सांगीतिक आस्था आणि प्रेम या माध्यमातून प्राप्त करत आहेत. “आनंद देणे आणि घेणे” यातच धन्यता आहे असे या ग्रुपचे सर्वेसर्वा शिरीष कुलकर्णी सांगतात. या कार्यक्रमाची सांगीतिक जबाबदारी गायत्री स्टुडिओस चे श्री मिलिंद जोशी आणि प्रशासनीय जबाबदारी श्री सत्यजित धांडेकर यांनीं सांभाळलेली आहे.
पंचमदा यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही श्रोत्यांच्या कानात रुंजी घालतात. कालानुरुप त्यांनी पाश्चात्य धाटणीचे संगीत आणले आणि ते भारतात लोकप्रिय देखील झाले. त्यांच्याबद्दलच्या विविध आठवणी काढत श्रोत्यांना हा कार्यक्रम भूतकाळातील आठवणींची रंगत आणेल यात शंकाच नाही. सध्या “कराओके” च्या काळात जरा लोप पावू लागलेला लाइव्ह जगविख्यात कलाकारांचा वाद्यवृंद हे या कार्यक्रमाचे विशेष आसेल. पंचम यांच्या गाण्यातील काही धून जेंव्हा सेक्साफोन, ट्रम्पेट, गिटार अश्या वाद्यात, हुबेहूब पेश होतात, तेंव्हा गाणे एकदम उठावदार होऊन प्रेक्षक थिएटर डोक्यावर घेतात असा अनुभव आहे.
संगीतातील अनेक दिग्गज कलाकार, स्टेजशो चे अनेक मान्यवर आणि आशीर्वाद देणारे आपल्या सारखे प्रेमळ श्रोते या कार्यक्रमाला बहुसंख्येने वर्णी लावतील. आपण सर्व सहकुटुंब, या विशेष हटके कार्यक्रमास हजेरी लावावी आणि आपल्या मनातील दडलेल्या पंचमदांच्या आठवणीला उजाळा द्यावा
_________________________________________________
जाहिरात