गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंडित सी. आर. व्यास शिष्यपरिवारातर्फे रविवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन !!
पुणे : पंडित सी. आर. व्यास उर्फ ‘गुणिजान’ शिष्य परिवारातर्फे रविवार, दि. 28 जुलै रोजी व्यासबुवांच्या जन्मशताब्दी वर्षातील गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता आणि सायंकाळी 5:30 वाजता अशा दोन सत्रात बी. एम. सी. सी.मधील लोहिया बिल्डिंग, पाचवा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे. व्यासबुवा यांनी रचलेल्या काही बंदिशी या निमित्ताने ऐकायला मिळणार आहेत. यात पंडित सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि शिष्य पंडित सुहास व्यास, पंडित श्रीराम शिंत्रे, अपर्णा केळकर, श्याम गुंडावार, ज्ञानराज औसेकर, मेघना घेरकर, केदार केळकर, ऋतुजा वाणी, नीरज गोडसे, ऐश्वर्या परदेशी, आनंद बोंद्रे यांच्यासह अनेक कलाकार गायन सेवा रुजू करणार आहेत.
अमेय बिच्चू, निलय साळवी, प्रणव गुरव, कौशिक केळकर संगत करतील. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात