गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ग्रेट भेट – परशुराम आर्थिक विकास महामंडळ व व्यापार मित्र पुणे !!
Pune :व्यापार मित्र पुणे चे अध्यक्ष कौस्तुभ दबडगे व टीम ने परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची पुण्यात विधान भवनात भेट घेतली.
या भेटीदरम्यान व्यापार, आरोग्य आणि शासकीय योजनांचे महत्त्व आणि इतर अनेक महत्वाच्या मुद्यांवर स्पष्ट चर्चा करण्यात आली. या प्रसंगी अनेक विषयांवर वारंवार बैठका घेऊन महत्वाचे विषय मार्गी लाऊ असे आश्वासन कॅप्टन दामले यांनी दिले.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कॅप्टन आशिष दामले यांचे व्यापार मित्र पुणे कडून सत्कार करण्यात आला व त्याचे अभिनंदन करून पुढच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.