Marathi FM Radio
Wednesday, July 15, 2026

डॉ. बाबासाहेब कांबळे यांना छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

डॉ. बाबासाहेब कांबळे यांना छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार !

पुणे : फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा गौरव केला जाणार आहे.

Advertisement


पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

Advertisement

Advertisement

माजी नगरसेविका लता राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वार कळविली आहे.

Advertisement

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular