गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानचा काव्यकिरण पुरस्कार वैजयंती आपटे यांना जाहीर !!
पुणे : सकस मुक्तछंद काव्यनिर्मितीसाठी रंगत-संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘काव्यकिरण पुरस्कार’ कवयित्री वैजयंती आपटे यांना जाहीर करण्यात आला आहे.
वैजयंती आपटे
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला येथे होणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ समीक्षक, व्याख्यात्या, विचारवंत डॉ. नीलिमा गुंडी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर व करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात अनुराधा काळे, प्रतिभा पवार, विनायक अनिखिंडी, अपर्णा डोळे, मीनाक्षी नवले, स्मिता जोशी-जोहरे, डॉ. ज्योती रहाळकर, तनुजा चव्हाण, माधुरी अशिरगडे, स्वप्नील पोरे, निलाक्षी महाडिक, भारती पांडे यांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात