गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नम्रता संभेराव यांना ‘नटरंग’चा कलागौरव पुरस्कार !!
गिरीश बापट स्मृती कृतज्ञता पुरस्कार सागर बगाडे यांना !!
पुणे : नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या 31व्या स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठानच्या कलागौरव पुरस्काराने लोकप्रिय विनोदी अभिनेत्री नम्रता संभेराव तर तिसऱ्या स्व. गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने राष्ट्रपती पदक विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दि. 20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
कलागौरव पुरस्काराचे वितरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते तर कृतज्ञता पुरस्काराचे वितरण आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती नटरंग ॲकॅडमीचे कार्याध्यक्ष जतिन पांडे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
या निमित्ताने नटरंग कला ॲकॅडमीच्या 150 कलाकारांचा नृत्यरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नृत्य दिग्दर्शन प्रणव कडेकर आणि पुष्कर तावरे यांचे आहे.
कार्यक्रमास नटरंग ॲकॅडमीच्या अध्यक्षा स्वरदा बापट यांच्यासह अभिनेत्री प्राजक्ता माळी, प्रिया बेर्डे, धीरज घाटे, ललित जैन, राजेश येनपुरे, गायत्री खडके, योगेश समेळ, गणेश बिडकर, डॉ. मिलिंद भोई, ॲड. प्रताप परदेशी, दत्ता सागरे, अजय खेडेकर, प्रमोद भालेराव,.
बाळासाहेब दाभेकर तसेच लीला गांधी, आशा काळे, मनिषा साठे, शमा भाटे, दादा पासलकर, स्वाती दातार, ज्योती चांदेकर, स्वाती दैठणकर, जयमाला इनामदार, मेघराज राजेभोसले, दीपक रेगे यांची यांची विशेष उपस्थिती असणार आहे.