गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आर्यन्स वर्ल्डस् स्कूल, भिलारेवाडीच्या ‘@ पृथ्वी’ला राजा नातू करंडक !!
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित एकांकिका स्पर्धेच्या निकालाची घोषणा : 28 जानेवारीला पारितोषिक वितरण !!
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत आर्यन्स वर्ल्डस् स्कूल, भिलारेवाडीने सादर केलेल्या ‘@ पृथ्वी’ एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावित राजा नातू करंडकावर आपले नाव कोरले. शाळेला तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
नाविन्यपूर्ण कल्पक सादरीकरणासाठी डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल, गणेशखिंडच्या ‘सात फेटेवाला’ या एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. संघाला मथुरामाई करंडक आणि दोन हजार पाचशे रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत 25 शाळांचा सहभाग होता. स्पर्धेचे परिक्षण डॉ. अंजली कराडकर, इंद्रायणी चव्हाण आणि गणेश इनामदार यांनी केले.
सांघिक द्वितीय क्रमांकासाठीचा शरद तळवलकर करंडक व दोन हजार रुपयांचे पारितोषिक भारतीय विद्याभवन, सुलोचना नातू विद्यामंदिर या शाळेने सादर केलेल्या ‘ट्रॉफी’ या एकांकिकेला तर सांघिक तृतीय क्रमांकासाठीचा संजीवन करंडक व एक हजार रुयपांचे पारितोषिक न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागने सादर केलेल्या ‘आभाळमाया’ या एकांकिकेला देण्यात येणार आहे.
राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
सांघिक प्रथम (राजा नातू करंडक) : @ पृथ्वी (आर्यन्स वर्ल्डस् स्कूल, भिलारेवाडी)
सांघिक द्वितीय (शरद तळवलकर करंडक) : ट्रॉफी (भारतीय विद्याभवन, सुलोचना नातू विद्यामंदिर)
सांघिक तृतीय (संजीवन करंडक) : आभाळमाया (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग)
नाविन्यूपर्ण व कल्पक सादरीकरण (मधुरा माई करंडक) : सात फेटेवाला (डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल, गणेशखिंड)
सर्वोत्तम लेखन (पालक वा शिक्षक) : गोविंद गोडबोले (@ पृथ्वी, आर्यन्स वर्ल्डस् स्कूल, भिलारेवाडी)
लेखन उत्तेजनार्थ : दीप्ती असवडेकर ट्रॉफी (भारतीय विद्याभवन, सुलोचना नातू विद्यामंदिर)
सर्वोत्तम दिग्दर्शन : रवींद्र सातपुते (आभाळमाया, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग)
दिग्दर्शन उत्तेजनार्थ : मुग्धा वडके (@ पृथ्वी, आर्यन्स वर्ल्डस् स्कूल, भिलारेवाडी)
अभिनय – स्पर्धेतील सर्वोत्तम अभिनय (मुलगा किंवा मुलगी) : अरण्या जगताप (अरण्या, @ पृथ्वी, आर्यन्स वर्ल्डस् स्कूल, भिलारेवाडी)
सर्वोत्तम अभिनय : मुलगा : अर्णव लहुरीकर (अर्णव, @ पृथ्वी, आर्यन्स वर्ल्डस् स्कूल, भिलारेवाडी)
सर्वोत्तम अभिनय : मुलगी : अहाना दिंडोरकर (आजी, सात फेटेवाला, डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल, गणेशखिंड)
सर्वोत्तम वाचिक अभिनय : कृष्णकांत बहिरट (वासू, पदक, मॉडर्न हायस्कूल मुलांचे, शिवाजीनगर)
अभिनय प्रमाणपत्र : श्रेयस सुलाखे (आजोबा, पावसातला पाहुणा, सेवा सदन इंग्लिश मिडियम स्कूल), रितेश भरडे (मोठा वाघ, आभाळमाया, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग), सिद्धी मोडक (कल्पनाशक्ती, कल्पतंत्र, चंद्रकांत दरोडे प्राथमिक विद्यालय), पार्थ कुलकर्णी (पोस्टमन, खादाड, सिटी प्राईड स्कूल, निगडी), ध्रुव ढसे (गोविंदा, ट्रॉफी, भारतीय विद्याभवन, सुलोचना नातू विद्यामंदिर), अमरनाथ बुरंगे (गोपी, पदक, मॉर्डन हायस्कूल मुलांचे, शिवाजीनगर),
अवनी परांजपे (ट्रॉफी स्टुंडट ऑफ इयर, ट्रॉफी, भारतीय विद्याभवन, सुलोचना नातू विद्यामंदिर), आदित्य मोरे (विक्रांत, ट्रॉफी, भारतीय विद्याभवन, सुलोचना नातू विद्यामंदिर), प्रत्युष महामुनी (पांडबा, आभाळमाया, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग), तेजस कवितके (विकी, आभाळमाया, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग).
जाहिरात