गोल्डन आय न्यूज नेटवर्क
छोटा गंधर्व प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी ‘सूर अमृताचे’!
सांगीतिक योगदनाबद्दल संजय देशपांडे यांचा सत्कार !!
पुणे : ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय हरिभाऊ देशपांडे यांची पंचाहत्तरी आणि सांगीतिक क्षेत्रातील सहा दशकांच्या प्रवासाबद्दल स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यान आले आहे.
सत्कार समारंभानिमित्त ‘सूर अमृताचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात देशपांडे यांचे ऑर्गनवादन होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष चारुशीला केळकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
संजय हरिभाऊ देशपांडे
कार्यक्रम शुक्रवार, दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे होणार असून देशपांडे यांचा सत्कार सुप्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी सहस्रबुद्धे असणार आहेत. प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
सांगीतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अनिल हरिभाऊ देशपांडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. संजय देशपांडे यांना प्रशांत पांडव तबलासाथ करणार आहेत तर प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक रवींद्र खरे यांचे निवेदन आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
———————————––————————–जाहिरात