गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे सोमवारी ‘प्रभू आले मंदिरी’ सांगीतिक कार्यक्रम !!
पुणे : कलाकारांचे माहेरघर असलेल्या पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सोमवार दि. 22 जानेवारी रोजी ‘प्रभू आले मंदिरी..’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम लक्ष्मी रोडवरील पूना गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचा शुभारंभ सकाळी 11 वाजता ज्येष्ठ व्हायोलिन वादक रमकांत परांजपे यांच्या सुश्राव्य वादनाने होणार आहे. जितेंद्र भुरूक, मनिषा निश्चल, गिरीश पंचवाडकर, राही शेंडगे, सुरेश काळे, मधुरा घैसास-बेहेरे, अश्विनी गायकवाड, राजेश दातार गीते सादर करणार आहेत तर अक्षय पंचवाडकर, जयंत साने साथसंगत करणार आहेत.
प्रभू श्रीरामांच्या चरणी संगीत सेवा रुजू करण्यासाठी दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुण्यातील विविध संस्थांच्या कलाकारांचाही यात सहभाग असणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
————————————————————–
जाहिरात