गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘डबल लाईफ’ चा आज पुण्यात प्रयोग !!
पुणे: संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवन देणारे जेष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांची यंदा जन्मशताब्दी आहे . त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे सुपुत्र व अभिनेते विजय गोखले यांनी नवे नाटक रसिका समोर आणले आहे.
‘डबल लाईफ’ असे या नाटकाचे नाव असून त्याचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग शनिवारी दिनांक 13 तारखेला होणार आहे.
शनिवार 13 जानेवारी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे होणार आहे.
म्युझिक कॉमेडी अशा प्रकारातील या नाटकाबाबत विजय गोखले सांगतात बदलत्या काळाची पावले ओळखून त्यानुसार बदललेले आधुनिक संगीत नाटक सादर करावे असे माझ्या मनात होते.
विद्याधर गोखले यांचेही तेच स्वप्न होते त्यामुळे डबल लाईफ हे नाटक रंगमंचावर आणायचे ठरवले हे पारंपारिक संगीत नाटक नाही तर एक प्रकारचे फ्युजन आहे. परंपरेचे आणि संस्कृतीचे पूजन जरूर करावे त्यासह काळाची पावले ओळखून बदलायलाही शिकले पाहिजे अन्यथा कोणत्याही क्षेत्रात प्रगती होऊ शकत नाही हा मूलभूत संस्कार मनोरंजनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या नाटकात केला आहे.
रंगशारदा प्रतिष्ठान या नाटकाची निर्मिती केली असून लेखन रवींद्र भगवते यांनी तर दिग्दर्शन रणजीत पाटील यांनी केले आहे.
विजय गोखले यांच्यासह शर्वरी बोरकर दीप्ती भागवत उदित पाटील शुभम जोशी विजया महाजन शशिकांत दळवी आणि ऋचा मोडक यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
जाहिरात