गोल्डन आय न्यूज नेटवर्क
अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाविषयी रविवारी मोफत मार्गदर्शन !
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या ललित कला केंद्र आणि नाट्यसंस्कार कला अकादमीच्या अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासंदर्भात रविवार, दि. 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
मार्गदर्शन सत्र सरिता विद्यालय, मित्रमंडळ सोसायटी, पर्वती पायथा येथे होणार आहे. ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी दिली.
जाहिरात