गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भालबा केळकर नाटिका स्पर्धेला सुरुवात !!
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेला आज (दि. 11) सुरुवात झाली.
स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होत असून स्पर्धेत 29 संघांचा सहभाग आहे. स्पर्धा दि. 11 ते 13 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता तर दि. 14 रोजी दुपारी 1 आणि सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. पारितोषिक वितरण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते होणार आहे.
आज सादर झालेल्या नाटिका : एका रेनबोची गोष्ट (आर्यन्स वर्ल्ड स्कूल, मानाजीनगर), नक्षत्रांचे देणे (मिलेनियम नॅशनल स्कूल), झिप्री (आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे), ला-टोमानिना (सिल्व्हर क्रेस्ट स्कूल (दुपार विभाग), शेरखानला वाचवा (श्वेत रंग, पुणे).
जाहिरात