गोल्डन आय न्यूज नेटवर्क
दि. 11 जानेवारी 2024
भालबा केळकर नाटिका स्पर्धेबाबत
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेला आजपासून (दि. 11) सुरुवात होत आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होत असून स्पर्धेत 29 संघांचा सहभाग आहे.
स्पर्धा दि. 11 ते 13 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता तर दि. 14 रोजी दुपारी 1 आणि सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पारितोषिक वितरण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते होणार आहे.
—————–———————————————
जाहिरात