गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पूना गेस्ट हाऊसतर्फे सोमवारी ‘चंदेरी आठवणी’
पुणे : सुलोचना, बेबी शकुंतला, शशिकला आणि आशा भोसले यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीवर आधारित ‘चंदेरी आठवणी’ हा दृकश्राव्य कार्यक्रम सोमवार, दि. 15 जानेवारी रोजी पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचने आयोजित केला आहे.
पूना गेस्ट हाऊस आणि बियाँड एंटरटेन्मेंट पुणे यांची प्रस्तुती असून सुलोचना, बेबी शकुंतला, शशिकला आणि आशा भोसले या चार थोर मराठी कन्यांच्या आठवणींना ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभाताई तेरणीकर उजाळा देणार आहेत.
त्यांच्याशी वंदना कुलकर्णी संवाद साधणार असून निवेदन अनघा कोऱ्हाळकर यांचे आहे. कार्यक्रम दि. 15 रोजी सायंकाळी 5 वाजता पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रोड येथे आयोजित केला असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक किशोर सरपोतदार यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात