गोल्डन आय न्यूज नेटवर्क
97व्या मराठी साहित्य संमेलनात डॉ. दीपक शिकारपूर सन्मानिय वक्ते !
पुणे : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी अशी राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांना अमळनेर येथे दि. 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
डॉ. दीपक शिकारपूर
वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य’ असा डॉ. शिकारपूर यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. ग्रामीण व निम शहरी भागातील मराठी भाषिक नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मातृभाषेत प्रसार हे त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या विषयावर आतापर्यंत 54 पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांत नियमित लेखन करून ते युवा पिढीला सक्षम व कौशल्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जाहिरात