गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ.दीपक शिकारपूर यांचे “मोबाईल ऍप सूची (डिरेक्टरी)” हे पुस्तक प्रकाशित.!
संगणक तज्ञ डॉ दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या ५४व्या “मोबाईल ऍप सूची (डिरेक्टरी) ” या पुस्तकाचे प्रकाशन आंतर राष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ व पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी पद्मविभूषण व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर , उत्कर्ष प्रकाशनाचे सुधाकर जोशी आणि निलिमा वाडेकर उपस्थित होते. हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
डॉ.दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या “मोबाईल ऍप सूची (डिरेक्टरी) “ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी (डाविकडून) सुधाकार जोशी,निलिमा वाडेकर, पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर लेखक दिपक शिकारपूर व ज्येष्ठ अर्थतज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय केळकर
डॉ. माशेलकर म्हणाले मराठी भाषेमध्ये मोबाईल ऍप सूची (डिरेक्टरी) तयार करणे हा अभिनय उपक्रम आहे.मराठी भाषेतील अशा प्रकारचे हे पहिले पुस्तक आहे. या मुळे शिक्षण,आरोग्य,मनोरंजन, गुंतवणूकदार,पाककला,विविध भाषा अशा विविध क्षेत्रातील लोकांना हे पुस्तक मार्गदर्शन ठरेल.
संगणक साक्षरता वाढविण्यासाठी मराठी भाषेतून ५४ पुस्तके लिहिल्या बद्दल डॉ.दिपक शिकारपूर यांचे डॉ. विजय केळकर यांनी अभिनंदन केले
डॉ.शिकारपूर म्हणाले मोबाईल ऍप्स अनेक व्यक्ती वापरतात पण त्यांची एकत्रित सूची (डिरेक्टरी) कुठेही उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य वाचकाला ती उपलब्ध व्हावी या हेतूने अनेक मोफत ऍप्सची माहिती या पुस्तकात दिली आहे.
जाहिरात