गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. न. म. जोशी यांचा 11 जानेवारीला विशेष सत्कारपूना गेस्ट हाऊस स्नेहमंच व अ. भा. मराठी बालकुमार संस्थेतर्फे आयोजन !!
पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या विशेष सत्कार सोहळ्याचे पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 11 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. न. म. जोशी
डॉ. जोशी हे दि. 11 जानेवारी 2024 रोजी 89व्या वर्षात पदार्पण करत असून त्यांच्या शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील योगदानास यावर्षी 70 वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी निवेदनाद्वारे दिली. कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात होणार आहे.
डॉ. जोशी यांचा सत्कार सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, शिक्षण प्रसारक मंडळीचे कार्याध्यक्ष ॲड. एस. के. जैन यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील अनुभवांविषयी डॉ. जोशी यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम या वेळी आयोजित करण्यात आला असून प्रसिद्ध चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
जाहिरात