गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*पुण्यात कुठे काय खावे…???*
*हे आवर्जून वाचा…*
🍔🧇🥙🌮🥗🍲🥮🥯🥨
*खास खादाड मंडळींसाठी : पुणे.*
१) *सुजाता मस्तानी* – इथली मंगो मस्तानी इज एव्हरग्रीन अन् प्रेम आहे. त्याबरोबरच सीताफळ अन् तस्तम सीझनला मस्तानी ही खूप छान असतात. जवळच “पंखन” मधून मस्त ज्वेलरी खरेदी करायची आणि सुजाताची मस्तानी प्यायची. एक संध्याकाळ मस्त जाते.
पत्ता – निंबाळकर तालीम , सदाशिव पेठ , पुणे ( शाखा भरपूर आहेत)
२) *बड्याज् हॉटेल बीग बी* – इथले पिठलं भाकरी जगात भारी, दही धपाट्याची चव जीभेवर रेंगाळत रहाते, येथील वडापाव देखील छान आहे, महाराष्ट्रीयन घरगुती पदार्थांसाठी प्रसिद्ध, सुपरस्टार अमिताभ बच्चन व गाणी म्हणण्याची आवड असणाऱ्यांनी आवश्य भेट द्यावी…
पत्ता – कॉसमॉस बॅंकेशेजारी, कात्रज डेअरी & आईस्क्रिम पार्लर जवळ,
पाषाण, पुणे.
३) *अण्णा* – इथले पोहे खूप भारी असतात. चटणी आणि सांबर शिवाय ज्या पोह्याना चव असते अश्या पठडीतले .
पत्ता – शनिवार वाड्याच्या बाजूला , कसबा पेठ पोलिस चौकी , शेजारी , पुणे
४) *सुशील* – इथले पोहे म्हणजे केवळ लाजवाब.. एकदम आगळीवेगळी चव.. कोथरुड ते नवी पेठ रोजचा प्रवास खास ह्या पोह्यांसाठी व्हायचा.
पत्ता – नवी पेठ , लाल बहादुर शास्त्री रोड , प्रेमाचे साई हॉटेल च्या बाजूला, पुणे
५) *हिंदवी स्वराज…🚩* – ह्याच्या वेगवेगळया गाड्यावर मिळणारी डाळ खिचडी तडका , शेवभाजी भारी आहे . ह्याचा कोअर विषय हा साजूक तुपातला साबुदाणा वडा अन् काकडी चटणी हा आहे…
पत्ता – जंगली महाराज मंदिराच्या विरुद्ध दिशेला आत , जे एम रोड , पुणे .
६) *काका वडेवाले* – इथला वडापाव भारी असतो. कुरकुरीत अन् एक आगळीच चव असणारा .
पत्ता – वनाज कॉर्नर ला बस स्टॉप शेजारी हातगाडी लागते . कोथरुड ,पुणे
७) *रास्ता पेठ खाऊ गल्ली* – इथे दालचा राइस , इडली सांबार अन् आबाची मिसळ ह्या गोष्टी जाम प्रसिद्ध आहेत.
पत्ता – केईम हॉस्पिटल च्या विरुद्ध दिशेला..
८) *सद्गुरू अमृततुल्य* – इथला साजूक तुपातला पायनापल शिरा भारी असतो.
पत्ता – कोथरुड डेपो , पुणे
९) *संस्कृती प्युअर् व्हेज* – इथली लसूण मेथी भाजी छान असते.
पत्ता – नारायण पेठ , पुणे
१०) *अंबिका सँडविच* – जगात भारी सँडविच खाल्ल्याचा आनंद इथे मिळतो.. इथली नेपोलियन सँडविच जी खासियत आहे . तर मायो मसाला चीज सँडविच हे ही भारी आहे. लिहतानाच तोंडाला पाणी सुटतय ती बाब अलाहिदा..
पत्ता – सिटी प्राइड शूज च्या बाजूला , कुमठेकर रोड , पुणे
११) *राधिका भेळ* – इथली एसपिडीपी खूप लाजवाब असते. पुऱ्यांवर वरतून टाकलेली शेव खूपच भारी असते.
पत्ता – ज्ञान प्रबोधिनी जवळ , सदाशिव पेठ , पुणे
१२ ) *निरा विक्री केंद्र* – इथे लाल पेरू , पान मसाला , जीरा मसाला अन् लिंबू हे सरबताचे प्रकार प्रचंड भारी असतात. लाल पेरू माझा फेवरेट आहे. तसेच इथे मिळणारे वेगवेगळ्या flavour चे कॉम्बिनेशन सोडा पण भारी असतात.
पत्ता – पत्र्या मारुती चौक , नारायण पेठ , पुणे
१३) *यशवंत दाबेली* – इथली दाबेली ही बाप आहे. पुण्यातली सर्वोत्कृष्ट म्हणाल तरी वावग ठरणार नाही.
पत्ता – हाँग काँग लेन , केएफसी च्या बाजूला , डेक्कन , पुणे
१४) *फ्लेवर टोस्ट* – इथे व्हेज ग्रिल सँडविच , चॉकलेट सँडविच अन् जांबून शॉट्स भारी असतात.
पत्ता – रानडे इन्स्टिट्यूट समोर , एफसी रोड , पुणे
१५) *लंडन bubble* – इथे मिळणारे waffles खूप crunchy अन् टेस्टी असतात.
पत्ता – कोथरुड . ( ह्याच्या franchise भरपूर ठिकाणी आढळतील )
१६ ) *खात्री बंधू आईसक्रीम* – याच्याकडे मिळणारी मावा , सीताफळ मस्तानी भारी असते.
पत्ता – शिवाजी पुतळा , कोथरुड ,पुणे. ( कर्वेनगर , वनाज कॉर्नर , सिंहगड रोड अश्या बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत )
१७) *राजमंदिर आईसक्रीम* – यांच्या इथे मिरचीची पूड वरतून टाकून भेटणारी लाल पेरू आईसक्रीम निव्वळ अप्रतिम.
पत्ता – न्यू डिपी रोड , कोथरुड , पुणे
(सिंहगड रोड , तसेच डेक्कन ला ही शाखा आहे )
१८) *तांबे मिसळ* – इथे मिळणारी तर्रिदार मिसळ खरोखरच मिसळ खाल्ल्याचा फील देते. हॉटेल च वातावरण typical असल तरी मिसळ तुम्हाला खुश करते.
पत्ता – शिवाजी पुतळा , कोथरुड , पुणे
१९) *शिवराज वडेवाले* – इथला कुरुकुरित असता जंबो वडा खाण्याची रंगत वाढवतो.
पत्ता – स्पेंसर चौक , कर्वेनगर , पुणे
( कोथरुड ला ब्रांच आहे पण मूळ शाखेतला वडा भारी आहे.)
२०) *विशाल चिवडा भेळ* – इतकी मटकी चिवडा भेळ प्रसिद्ध आहे. शेव , पोह्याचा चिवडा , हिरव्या मिरचीचा ठेचा अन् मटकी अन् त्यावर पिळलेल लिंबू केवळ अप्रतिम…
पत्ता – स्पेंसर चौक , कर्वेनगर , पुणे
२१) *एस एम टी सेंटर* – इथे मिळणार इडली सांबार बाप असतं. घरगुती जेवण ही खूप छान मिळत.
पत्ता – aspirant लायब्ररी समोर , कर्वेनगर ,पुणे
२२) *लाखेश्र्वर अमृततुल्य* – काचेच्या मोठ्या ग्लासात मिळणारा चहा केवळ सुखं देतो.
पत्ता – कर्वेनगर ( कमिन्स कॉलेज जवळ ) अन् वारजे हायवे ला अश्या दोन ब्रंच आहे.
२३) *कॅफे दुर्गा* – पुण्यात नवीन आल्यावर जिकडे तिकडे दिसणाऱ्या ह्या नावावरून पुण्याची प्रसिद्ध कॉफी म्हणून फसवणूक होऊ शकते. तरी सावध रहा . पत्ता नीट वाचा. इथे मिळणारी कोल्ड कॉफी अन् कोल्ड चॉकलेट तृप्तीचा आनंद देत. MIT वाल्यांच्या अन् कोथरुड करांच्या आयुष्यातील mandatory गोष्ट.
पत्ता – पौड रोड , MIT कॉलेज जवळ , हॉटेल जंजिरा समोर , कोथरुड पुणे .
२४) *हॉटेल ममता* – मालक अन् कामगार साऊथ इंडियन तरी इथे नॉर्थ इंडियन प्रकारातल्या भाज्या खूप छान मिळतात. आणि बजेट फ्रेंडली हॉटेल आहे.
२५) *बिपिन स्नॅक्स सेंटर* – इथले पोहे , ब्रेड पॅटीस आणि काकडी खिचडी लाजवाब आहे..
पत्ता – विमलाबाई गरवारे शाळेच्या बाजूला , डेक्कन कॉर्नर , पुणे.
२६) *संतोष बेकरी* – इथल खारी पॅटीस अन् खोबरा केक भारी असतो.
पत्ता – आपटे रोड , पुणे
२७) *कडक स्पेशल मिसळ* – गोड तिखट प्रकारातली मिसळ छान असते.
पत्ता – मयुर कॉलनी , कोथरुड ,पुणे
२८) *हिना टी सेंटर* – इथे आद्रक टाकून केलेला चहा भारी असतो.
पत्ता – पेरुगेट पोलिस चौकी समोर , सदाशिव पेठ , पुणे.
२९) *मोमो पांडा* – इथे तंदूरी मोमोज भारी मिळतात.
पत्ता – करिश्मा सोसायटी , कोथरुड
( ब्रांचेस आहेत ह्याच्याही )
३०) *ममता मेस* – इथे राजस्थानी पद्धतीचे जेवण छान मिळते. गुरवारी संध्याकाळी व रविवारी सकाळी स्पेशल मेनू असतो.
पत्ता – रामबाग कॉलनी , कोथरुड, पुणे
३१) *राजू अंकल* – छोले भटुरे छान मिळतात.
पत्ता – भारती विद्यापीठ बॅक गेट , कात्रज
३२) *naturals* – इथे मिळणारी टेंडर कोकोनट आईसक्रीम जाम भारी असते.
पत्ता – कर्वे पुतळा तसेच बालगंधर्व ह्या ठिकाणी शाखा आहेत.
३३) *ला डे खीर डेली* – इथे मिळणार्या वेगवेगळ्या प्रकारच्या खीर म्हणजे केवळ अप्रतिम.
पत्ता – घोले रोड , बालगंधर्व चौक , पुणे
३४) *काटा किर्र* – तिखट प्रकारातल्या मिसळ मध्ये वरतून कांदा लसूण मसाला अन् तर्री टाकून जाळ अन् धूर काढणारी मिसळ.
पत्ता – प्रभात रोड च्या शाखेला भेट द्या. बाकिकडे चवी मध्ये फरक वाटला.
३५) *नेवाळे मिसळ* – तिखट प्रकरातील ही अजुन एक मिसळ.
पत्ता – चिंचवड
३६) *कॅफे गुडलक* – बन मस्का पाव भारी असतो. तसेच जेवणही हटके असत. तिथे रुमाली कशी बनवतात हे पहाण्यासाठी खूप वेळ टंगळमंगळ करत बसलोय.
३७) *बालाजी स्नॅक्स सेंटर* – इथे घरगुती जेवण छान मिळते .
पत्ता – कर्वेनगर , पुणे
३८) *सुकांता* – इथली थाळी प्रचंड फेमस आहे. पण एक मोलाचा सल्ला देतो .पहिल्यांदाच भाज्या कमी प्रमाणात घ्या अन् एखादीच रोटी. चाट जास्त खाऊन पोट भरायची काम करू नका. फक्त रबडी वर लक्ष केंद्रित करा. कारण इथल्या सारखी रबडी शक्यतो कुठे मिळत नाही थाळी ह्या प्रकरात. नंतर मला नक्कीच तुम्ही धन्यवाद द्याल.
पत्ता – डेक्कन , Z-bridge जवळ , पुणे
३९) *barbeque नेशन* – हा प्रचंड पैसे देऊन quantity च्या नावाखाली येड बनण्याचा प्रकार आहे. इथली पान आईसक्रीम अन् कॉर्न चाट भारी असतं.
पत्ता – डेक्कन , कल्याणी नगर , हॉटेल सयाजी , अमानोरा ला ब्रांचं आहेत.
४०) *रामनाथ मिसळ* – कोल्हापुरी पद्धतीची मिसळ छान भेटते.
पत्ता – महाराष्ट्र मंडळा जवळ , टिळक रोड , पुणे
४१) *मोरे डोसा सेंटर* – स्पंज डोसा , टोमॅटो ओनियन चीज डोसा भारी भेटतो. इथली हिरवी चटणी खूपच लाजवाब.
पत्ता – कर्वे पुतळा , कोथरुड तसेच कोथरुड स्टँड जवळ व सातारा रोड ला शाखा आहेत.
४२) *मानकर डोसा* – या ठिकाणी ही उत्तम डोसे मिळतात.
पत्ता – कर्वे रोड , करिश्मा सोसायटी जवळ , कोथरुड , पुणे
४३) *सुप्रीम पावभाजी* – चांगली पण खूपच overrated झालेली पावभाजी मिळते.
पत्ता – जे एम रोड , पुणे
४४) *चैतन्य पराठा हाऊस* – इथे मिळणारा फुल चीज पराठा माझा विक पॉईंट आहे. अजूनही बरेच पराठे मिळतात.
पत्ता – तुकाराम पादुका चौक , एफसी रोड , पुणे
४५) *अगरवाल कचोरी* – कचोरी , समोसा आणि मुगभजी खूप भारी असतात.
पत्ता – काका हलवाई जवळ , बुधवार पेठ , पुणे.
४६) *शिवशंकर* – लस्सी आणि कलाकंद भारी असते.
पत्ता – काका हलवाई जवळ , बुधवार पेठ , पुणे
४७) *शिवकैलास* – वरतून लोणी टाकून मिळणारी लस्सी अप्रतिम असते. अन् रबडी ही.
पत्ता – पुणे स्टेशन समोर , पुणे
४८) *शशिकांत डेरी* – इथे मिळणार मसाला ताक म्हणजे लाजवाब. लस्सी ही छान असते.
पत्ता – *केईएम् हॉस्पिटल जवळ , गुंदेचा चौक, रास्ता पेठ , पुणे*
४९) *हॉटेल महेंद्र* – इथे शेवभाजी चांगली भेटते.
पत्ता – कर्वेनगर , पुणे
५०) *हॉटेल आनंद उपाहार गृह* – इथे गुरवारी दोन्ही वेळेस आणि रविवारी सायंकाळी मिळणारी मुगदाल खिचडी आणि कढी निव्वळ अप्रतिम. कोशबिर पण भारी असते. रविवारी सकाळी आळुची भाजी अन् मसालेभात ची छान असतो.
पत्ता – नागनाथ पार , सदाशिव पेठ , पुणे
५१) *मातोश्री भेळ* – इथे खूप छान भेळ मिळते.
पत्ता – जय भवानी नगर , कोथरुड , पुणे ( शिवराय शाळेजवळ )
५२) *एसएनडीटी* ला जोशी उपहार गृहाजवळ एक हातगाडी लागते तिथले कांदाभजी अप्रतिम असतात.
पत्ता – Sndt बस स्टॉप ( SBI बँक च्या शेजारील बोळीत ), पुणे
५३) *केएचएस* शाळेसमोर शेवपाव खूप भारी मिळतो.
पत्ता – एरंडवने , पुणे
५४) *इंदोर फुड्स* – पोहे , प्याज कचोरी आणि घी जलेबी निव्वळ अप्रतिम.
पत्ता – शिवार गार्डन चौक , पिंपळे सौदागर , पुणे
५५) *हॉटेल ममता* समोर एक हातगाडी लागते तिथे चॉकलेट सँडविच छान असते.
पत्ता – कोथरुड , पुणे
५६) *नागनाथ पार चौकात* मिळणारे मसाले दूध छान असते. इथली चवआधी खूप छान होती पण सद्ध्या इतरांपेक्षा तरी चांगलं आहे.
पत्ता – सदाशिव पेठ , पुणे
५७) *वाडेश्र्वर* – इथे घी इडली भारी भेटते.
पत्ता – एफसी रोड , पुणे
५८) *वैशाली* – इथला म्हैसूर डोसा जगात भारी असतो.
पत्ता – एफसी रोड , पुणे
५९) *हॉटेल मालगुडी डेज* – इथे उत्तप्पा अन् डोसा छान मिळतो. त्यासोबत मिळणाऱ्या चटण्या , सांबर
अप्रतिम असते.फिल्टर कॉफी ही छान असते.
६०) *FIR* – इथे छान वेगळ्या पद्धतीचे आईस क्रीम रोल्स भेटतात.
पत्ता – सिटी प्राइड , कोथरुड जवळ , पुणे
६१) *कॅड एम अन् कॅड बी* – करिश्मा सोसायटी आणि गुडलक चौकात छान मिळते.
६२) *नारायण खमंग ढोकळा* – इथला ढोकळा आणि रविवारी मिळणारा चायनीज समोसा छान असतो.
पत्ता – वारजे नाका , वारजे माळवाडी, पुणे
६३) *जयेश सँडविच* – सँडविच साठी प्रसिद्ध
पत्ता – कर्वे रोड , करिश्मा सोसायटी जवळ , कोथरुड , पुणे.
६४) *अलंकार ज्युस सेंटर* – हे खरेतर ऍपल ज्यूस साठी फेमस आहे. पण इथे सीताफळ अन् मँगो शेक ही छान असतो. ऍपल ज्यूस पूर्वी खूप छान होता .
पत्ता – गरवारे सेंट्रल जवळ ( संजीवन हॉस्पिटल समोर ) , पुणे
६५) *हॉटेल टिळक* – इथला चहा छान असतो.
पत्ता – टिळक रोड , पुणे
६६) *हॉटेल सुखकर्ता* – हे हॉटेल ही थाळी साठी प्रसिद्ध आहे. परंतु लोकांनी फार स्वीट खाऊ नये म्हणुन ते खूप गोड बनवलेलं असत. बाकी भाज्या , चाट वगैरे छान असतं.
पत्ता – मयुर कॉलनी , कोथरुड , पुणे
६७) *हरी ओम ज्यूस सेंटर* – इथे बेरी ज्यूस खूप भारी असतो. तसेच सिजनल ज्यूस /शेक छान असतात.
पत्ता – पौड रोड ,कोथरुड , पुणे
६८) *हॉटेल जंजिरा* – नॉर्थ इंडियन भाज्या छान असतात. अन् dessert ही छान आहेत.
पत्ता – MIT कॉलेज रोड , कोथरुड , पुणे
६९) *गोल्डन ड्रॅगन* – इथे चायनीज हे खूप अप्रतिम मिळते. आणि सूप तर खूप लाजवाब.
पत्ता – कर्वे रोड , कोथरुड , पुणे
७०) *सुदित्सु* – हे ही चायनीज साठी प्रसिद्ध आहे.
पत्ता – डहाणूकर कॉलनी , कोथरुड , पुणे
७१) *हॉटेल पृथ्वी* – पंजाबी डिशेस अन् स्टार्टर्स छान भेटतात.
पत्ता – कर्वे रोड , कोथरुड , पुणे
७२) *हॉटेल जगदंब* – व्हेज प्रकारात शेव भाजी छान भेटते.
पत्ता – खेड शिवापूर , पुणे
७३) पिठल भाकरी , भरीत अन् कांदा भजी हे प्रकार सिंहगडावर छान मिळतात.
७४) शगुन चौकातून नारायण पेठ येथे जाताना,” मोमोस”मिळणारे एक ठिकाण खास आहे. लिस्ट खूप लांबलीये. पण जे जे छान मिळत ते बऱ्यापैकी आलंय.
बरीच फेमस ठिकाण जसं की गार्डन वडापाव, हॉटेल दुर्वांकुर , हॉटेल सुरभी. कोक – पा , बेडेकर मिसळ , श्रीकृष्ण मिसळ , अमृतेश्वर अमृततुल्य ( नळ स्टॉप रात्री ३ वाजता उघडे असणारे ) , बारबेक्यू थोरात मिसळ / पावभाजी, हॉटेल किनारा , हॉटेल मथुरा. मोहन आईसक्रीम (प्रचंड overrated अशी) , जोशी वडेवाले, रोहित वडेवाले हे जाणून बुजून वगळले आहेत. कारण हे एक टाईम ट्राय करण्यासाठी ठीक वाटतात. तर हॉटेल अभिषेक, हॉटेल शिवसागर, आवजी खावजी, हॉटेल समुद्र, रामदेव दाल बाटी, गौरीशंकरचा शिरा, सर मिसळ आदी तत्सम ठिकाण बकेट लिस्ट मध्ये आहेत…………
🧆🥙🍛🍔🥪
जाहिरात