पत्रकार परिषदेचे निमंत्रण
प्रति,
मा. संपादक
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी दि. 27 पासून सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मूळचे महाराष्ट्रीय असलेले अजयकुमार वनारसे तसेच व्ही. व्ही. एल. श्रीनिवास, जयचंद्र वर्मा स्पर्धा पाहण्यासाठी पुण्यात आले आहेत.
सुरभी थिएटरच्या माध्यमातून अजकुमार वनारसे, जयकुमार वर्मा हे संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. श्रीनिवास हे नाट्य शास्त्राचे प्राध्यापक असून ते पाँडेचेरी, भूवनेश्वर, अमृतसर आणि दिल्ली येथे कार्यरत होते. पथनाट्य या क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तसेच ते देशातील विविध विद्यापीठांमधील नाट्यशास्त्र विभागात परिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. ही कलावंत, अभ्यासक मंडळी गुरुवार, दि. 28 रोजी दुपारी 1 वाजता फडके हॉल येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
या प्रसंगी आपल्या वृत्तपत्र/वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींची उपस्थिती प्रार्थनिय आहे.
पत्रकार परिषदेनंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
—————— ——————————————–जाहिरात