गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहर व्यापारी आघाडी आयोजित बीजेपी ट्रेड लीग, सिझन १ ही स्पर्धा आज पुण्यात बिबवेवाडी येथील मैदान द टर्फ येथे पार पडली. या क्रिकेट स्पर्धेत एकूण ८ टीम्स ने भाग घेतला, विविध मतदारसंघातून अनेक व्यापारी पदाधिकाऱ्यांनी या लीग क्रिकेटला मोठा प्रतिसाद दिला.
या लीग स्पर्धेस भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष श्री धीरजजी घाटे, पुणे कॅंटॉनमेंट विधानसभा आमदार श्री सुनीलजी कांबळे, पुणे शहर सरचिटणीस श्री बापू मानकर, श्री पुनीत जोशी, सौ वर्षाताई तापकीर, पुणे शहर भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री नामदेव माळवदे, पुणे भाजपा युवा मोर्चा प्रभारी श्री प्रतीक देसर्दा या मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावत या स्पर्धेचा आनंद लुटला.
महाराष्ट्रातील विविध गडांची नावे टीमला देत व्यापारी आघाडीने महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. नॉकआऊट, सेमी फायनल आणि फायनल अशी रचना असलेल्या या स्पर्धेत देवगिरी आणि लोहगड या दोन संघांच्या अतिशय रोमांचक स्पर्धेत लोहगडने बाजी मारत बीजेपी ट्रेड लीग २०२३ सिझन १ चे जेतेपद पटकाविले तर देवगिरी संघ उपविजेता ठरला.
जाहिरात