गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानचा आदर्श आई पुरस्कार विजयाबाई मानकोसकर यांना जाहीर.!!
पुणे : काबाडकष्ट करून मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकीतून अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य खुलविणाऱ्या, ज्येष्ठ सनदी अधिकारी सुरेंद्र मानकोसकर यांच्या मातोश्री विजयाबाई चंद्रकांतराव मानकोसकर यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे यंदाचा आदर्श आई पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
विजयाबाई चंद्रकांतराव मानकोसक
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आल असून पुरस्कराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, ज्येष्ठ सनदी अधिकारी सुरेंद्र मानकोसकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी एका कर्तबगार मातेस आदर्श आई पुरस्कार प्रदान केला जातो. आईच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नसले तरी त्या ऋणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले जाते. विजयाबाई चंद्रकांतराव मानकोसकर यांनी कष्टप्रद जीवन जगत कुटुंबातील 12 जणांना डॉक्टर केले. दोन मुलांना उच्चपदस्थ अधिकारी बनविले. कुटुंबाच्या प्रगतीबरोबरच समाजाप्रती जाणिव ठेवून ग्लोबल थॉट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
त्यांच्या या कार्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जाहिरात