गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*सिंहगड करंडक वक्तृत्व स्पर्धेत तुषार देव यांस प्रथम क्रमांक !
पुणेः- सिंहगड करंडक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२३ मध्ये पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार देव यास प्रथम क्रमांक मिळाला असुन त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.व त्यास पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा मिळत आहेत.
केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्था,वडगाव बुद्रुक,पुणे आयोजित जिल्हास्तरीय ‘सिंहगड करंडक वक्तृत्व स्पर्धा २०२३ मध्ये महाविद्यालयीन गटात मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील पुणे शिक्षण मंडळाचे ‘अनंतराव पवार महाविद्यालय येथील एफ.वाय.बी.ए.चा विद्यार्थी तुषार स्वानंद देव याने या स्पर्धेत राज्य घटना,संशोधन आणि बदल या विषयावर अभ्यासपुर्ण व आत्मविश्वासाने विषयाची उत्कृष्ट मांडणी करुन वक्तृत्व केले व प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे आयोजन अभिरुची येथील गुलमोहर हाॕल ,सिंहगड रोड,पुणे येथे केले होते.संपन्न झालेल्या स्पर्धेचा निकाल लगेच जाहीर करण्यात आला व पुणे मनपा चे नगरसेवक हरिदास चरवड यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येऊन स्पर्धकांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातुन अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमास कला,क्रिडा,सांस्कृतिक ,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात