गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ॲड. प्रमोद आडकर यांचा मंगळवारी षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त होणार सन्मान !!
पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ संयोजक, लेखक ॲड. प्रमोद आडकर यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ॲड. आडकर यांचा वाढदिवस दि. 6 डिसेंबर असून सन्मान सोहळा षष्ठ्यब्दीपूर्तीच्या पूर्वसंध्येला, मंगळवार, दि. 5 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन ईटकर आणि कार्याध्यक्ष उद्धव कानडे यांनी निवेदनाद्वारे दिली.
ॲड. आडकर यांचा सत्कार डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम असणार आहेत. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, असे सचिन ईटकर आणि उद्धव कानडे यांनी सांगितले.
—————————————————————
जाहिरात