गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बाबा भारती प्रतिष्ठानचा आयुर्वेदभूषण पुरस्कार डॉ. भालचंद्र भागवत यांना जाहीर !
पुणे : बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ, माजी प्राचार्य डॉ. भालचंद्र भागवत यांना आयुर्वेदभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी निवेदनाद्वारे दिली.
डॉ. भालचंद्र भागवत
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता टिळक आयुर्वेद महाविद्यालय, रास्ता पेठ येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पुराणिक असणार आहेत.
इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सरोज पाटील, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भीम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
जाहिरात