गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आडकर फौंडेशनतर्फे रविवारी चैताली माजगांवकर-भंडारी यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन !!
पुणे : अभिनेत्री-कलावंत चैताली माजगांवकर-भंडारी यांच्या बोलक्या बाहुल्यांच्या एक हजाराव्या प्रयोगानिमित्त आडकर फौंडेशनतर्फे रविवारी (दि. 26) त्यांच्या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
चैताली माजगांवकर-भंडारी
कार्यक्रम सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून माजगांवकर-भंडारी यांचा सत्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात माजगांवर-भंडारी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्याशी ॲड. प्रमोद आडकर व ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन संवाद साधणार आहेत.
————————————————————————-
जाहिरात