गोल्डन आय न्यूज नेटवर्क
राजदत्त देणार रमेश-सीमा देव यांच्या आठवणींना उजाळा !
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे सोमवारी विशेष कार्यक्रम !!
पुणे : पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे प्रसिद्ध अभिनेते दिवंगत रमेश व सीमा देव यांच्यावर दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम सोमवार, दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. विख्यात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती असणार असून ते देव दाम्पत्याच्या चित्रपट कारकिर्दीतील अनेक आठवणी सांगणार आहेत.
कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रस्ता येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी निवेदनाद्वारे दिली.
रमेश व सीमा देव यांच्यावर चित्रित झालेली अजरामर लोकप्रिय गीते दृकश्राव्य माध्यमातून यावेळी दाखविली जाणार आहेत.
या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती किशोर सरपोतदार यांची असून निर्मिती सहाय्य ‘महक’च्या मनिषा निश्चल यांचे आहे. दृकश्राव्य स्वरूपातील सादरीकरण शरद आढाव करणार आहेत. राजदत्त यांच्याशी शिरीष कुलकर्णी संवाद साधणार आहेत. अजित कुमठेकर हे कार्यक्रमाचे समन्वयक आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात