गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. सुधा कांकरिया लिखित
‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे शनिवारी प्रकाशन !!
पुणे : बेटी बचाओ अभियानाच्या प्रणेत्या आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. 8 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मानकन्हैय्या ट्रस्ट, अहिल्यानगर आयोजित कार्यक्रम सकाळी 10 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. लोकशिक्षण आणि जनजागृतीच्या हेतूने प्रकाशित करण्यात येणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी असणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, यशोवाणीच्या प्राची गुर्जर, अखिल भारतीय महिला जैन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा विमल बाफना यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे,
अशी माहिती मानकन्हैय्या ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.