गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भरत नाट्य मंदिरातर्फे रविवारी ‘पंचतुंड ते सर्वात्मका’ नाट्यसंगीत कार्यक्रम !
पुणे : रंगभूमीदिनानिमित्त भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे रविवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी ‘पंचतुंड ते सर्वात्मका’ या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिरात होणार आहे.
कार्यक्रमात सावनी दातार, कविता मेहेंदळे, भक्ती पागे, निधी घारे, अनुष्का आपटे, गौरी पाटील, हृषिकेश बडवे, संजीव महेंदळे आणि चारुदत्त आफळे यांचा सहभाग असणार आहे.
राहुल गोळे (ऑर्गन), प्रसाद करंबेळकर (तबला) साथसंगत करणार असून निवेदन अभय जबडे करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात