गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी लीला गांधी यांचा विशेष सन्मान !!
पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना लीला गांधी यांच्या अभिनय-नृत्य कारकिर्दीला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या विशेष सन्मान सोहळ्याचे आणि ‘लावण्य’ या लावण्यांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
लीला गांधी
कार्यक्रम शुक्रवार, दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. लीला गांधी यांचा सत्कार कथक नृत्यगुरू पंडिता मनिषा साठे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित करण्यात आलेल्या ‘लावण्य’ या लावण्यांच्या कविसंमेलनात जयंत भिडे, श्रीनिवास शारंगपाणी, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, अश्लेषा महाजन, चंद्रकांत धस, सुजाता पवार, वासंती वैद्य, मीना शिंदे, रुपाली अवचरे, स्वप्नील पोरे, डॉ. राजश्री महाजनी, डॉ. रेखा देशमुख, अश्विनी पिंगळे, सीताराम नरके, विजय सातपुते, तनुजा चव्हाण, मृणालिनी कानिटकर-जोशी यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात