गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी सांगीतिक मैफल !
पुणे : प्रतिभावान हिंदुस्थानी शास्त्रीय गायक व संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी शास्त्रीय गायन-वादन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वरांजली, गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैफल सायंकाळी 5:30 वाजता गांधर्व महाविद्यालयाचे विष्णू विनायक स्वरमंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र आणि शिष्य पंडित शौनक अभिषेकी तसेच अभिषेकीबुवा यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. मोहनकुमार दरेकर यांचे शास्त्रीय गायन तर डॉ. विश्वास कुलकर्णी यांचे बासरीवादन होणार आहे.
सुभाष कामत, मंदार पुराणिक (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी) साथसंगत करणार असून प्रज्ञा कामतीकर निवेदन करणार आहेत. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात