गोल्डन आय न्युज नेटवर्क
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे रविवारी ‘शतपैलूचे तेजपर्व’ कार्यक्रमाचे आयोजन !
पुणे : अंधश्रद्धा निवारण आणि विज्ञानवादी विचारप्रणालीचा अंगीकार करून कार्यरत असलेल्या स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे रविवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर ‘शतपैलूचे तेजपर्व’ या संवादात्मक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता अश्वमेध हॉल, रांका ज्वेलर्स जवळ, कर्वे रस्ता, एरंडवणे येथे होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, सात्यकी सावरकर, सावरकर साहित्य अभ्यासक अक्षय जोग आणि वृत्तनिवेदिका मंजिरी मराठे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचे विचार या निमित्ताने ऐकावयास मिळणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी असणार आहेत, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे दिली.
या प्रसंगी ‘तेजपर्व’ या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात