गोल्डन आय न्यूज नेटवर्क – (वृत्त संकलन आत्माराम ढेकळे)
सद्गुरु विश्वनाथबाबा यांची चतुर्थ पुण्यतिथी साजरी !!
पुणेः- येथील गंगाधाम परिसरातील ‘साई विश्वनाथ दरबार’ येथे प.पु.सद्गुरु विश्वनाथबाबा यांची चतुर्थ पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रम सादर करुन साजरी करण्यात आली.
गंगाधाम परिसरातील ॐसाई विश्व नरेंद्र (साई विश्वनाथ दरबार)या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यावर्षीही ‘प.पु.सद्गुरु विश्वनाथबाबा ‘यांची चतुर्थ पुण्यतिथी साजरी करण्यात आली.याप्रसंगी पहाटे अभिषेक, आरती,भजन दुपारची आरती व महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सर्व भाविकांनी गुरुमाऊली श्रीमती नीताजी संतोषजी रांका यांचे आशिर्वाद घेतले.व गुरु स्व.संतोषजी रांका (संतनाथ बाबा) यांचे स्मरण केले.या कार्यक्रमास विविध ठिकाणाहुन भाविकजन उपस्थित होते.भजनाची सेवा नेहमीप्रमाणेच अखिलेशकुमार शुक्ला व शिवसहाय सिंह यांनी दिली.सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
जाहिरात