गोल्डन आय न्यूज नेटवर्क
तैवानच्या प्रसिद्ध पपेट थिएटरचा रविवारी पुण्यात खेळ !!
पुणे : केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालय आणि सिंबायोसिस इन्टरनॅशनल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) तैवानच्या प्रसिद्ध पपेट थिएटरचा अनोखा आविष्कार अनुभवण्याची संधी पुणेकरांना पहिल्यांदाच मिळणार आहे.
झेन यून लीन गे ग्रुप सादर करीत असलेला कार्यक्रम दि. 22 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सिंबायोसिस विश्वभवन ऑडिटोरिअम, सेनापती बापट रोड येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार यांनी निवेदनाद्वारे दिली.
कलात्मक, कल्पनारम्य आणि सर्जनशील वृत्तीने सादरीकरण करणारा संघ अशी झेन यून लीन गे ग्रुपची ओळख आहे. या ग्रुपची स्थापना 1975मध्ये एलआय युंग यांनी केली आहे. कठपुतळी हा कलाविष्कार त्यांनी त्यांचे बंधू एलआय जिन शू यांच्याकडून आत्मसात केला आहे. पारंपरिक, धार्मिक कथांची गुंफण करून आकर्षक बाहुल्या आणि अनोख्या वाद्यांच्या सहाय्याने कलाकार मंडळी सादरीकरण करतात.
तैवानधील प्रथितयश गु्रपपैकी झेन यून लीन गे हा ग्रुप आहे. यूके, फ्रान्स, अर्जेंटिना, तैवान आणि चीनमधील विविध नाट्य महोत्सवांमध्ये ग्रुपपैकी झेन यून लीन गे गु्रपने सहभाग नोंदविलाआहे.
या अनोख्या कार्यक्रमाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले असून पुणेकरांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार यांनी केले आहे.
जाहिरात