गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्रांतिकारी भविष्य विषयावर
डॉ. दीपक शिकारपूर यांचे व्याख्यान!!
पुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या पुणे संवाद या उपक्रमाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्रांतिकारी भविष्य या विषयावर बुधवारी (दि. 18) ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी 11 वाजता मयूर कॉलनीतील एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि करिअर कोर्सेस विभागातील एमईएस सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे विश्वस्त एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) असणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
————————————————————————–
जाहिरात