गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भरत करंडक एकांकिका स्पर्धेला जल्लोषात सुरुवात !!
पुणे : अखंडित 129 वर्षांची कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेला आज (दि. 16) जल्लोषात सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘उघडा डोळे बघा नीट’ या एकांकिकेने स्पर्धेचा पडदा उघडला.
भरत करंडक एकांकिका स्पर्धेची सुरुवात पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘उघडा डोळे बघा नीट’ या एकांकिकेने झाली. एकांकिकेतील एक क्षण.
स्पर्धेचे यंदाचे 17वे वर्ष असून स्पर्धेत 27 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धा दि. 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी 5 ते 11 या वेळात भरत नाट्य मंदिरात होत आहे. स्पर्धेची सुरुवात भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, विश्वस्त प्रदिप रत्नपारखी, प्रतिभा दाते, कार्यवाह, स्पर्धेचे संयोजक संजय डोळे, विश्वास पांगारकर यांच्या उपस्थितीत रंगमंचाचे पूजन करून करण्यात आली.
जाहिरात