गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘अमेरिकन अल्बम’च्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगानिमित्त कलाकार-तंत्रज्ञांचा गौरव !
रसिकमोहिनीतर्फे रंगभूमी सेवक संघाला आर्थिक मदत !!
पुणे : रसिकमोहिनी आणि फ्रेंड्स फॉर एव्हर थिएटर ग्रुपची निर्मिती असलेल्या ‘अमेरिकन अल्बम’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी प्रयोगानिमित्त नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला.
तसेच पडद्यामागील कलाकारांच्या रंगभूमी सेवक संघाला रसिकमोहिनीतर्फे आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी, माधवी महाजनी, नाटकाचे लेखक राजन मोहाडिकर, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, व्यवस्थापक समीर हंपी, धनंजय गाडगीळ, सुरेंद्र गोखले, सिद्धार्थ देसाई, मोहनदास प्रभू, झरीन ईराणी, डॉ. सतिश देसाई, सुरेश धर्मावत तसेच नाटकाच्या निर्मात्या, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, अभिनेते दीपक करंजीकर, आशुतोष नेर्लेकर, मोनिका जोशी, चिन्मय पाटसकर, अमृता पटवर्धन उपस्थित होते.
रंगभूमी सेवक संघास मदतीचा धनादेश देताना गश्मीर महाजनी, भाग्यश्री देसाई, सिद्धार्थ देसाई.
‘अमेरिकन अल्बम’ या नाटकाचे अनेक प्रयोग बघणारे मुंबईतील रसिक श्रीकृष्ण कुलकर्णी यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. गश्मीर महाजनी यांनी नाटकाच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकाच्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून दाद दिली. रसिकमोहिनी आर्टस् निर्मित ‘सूर शोधताना’ हा लघुपट या प्रसंगी प्रदर्शित करण्यात आला.
रसिकमोहिनी संस्थेच्या वाटचालीत रंगभूमी सेवक संघाचा मोलाचा वाटा आहे. रसिकमोहिनी संस्थेची निर्मिती असलेल्या प्रत्येक नाटकाची पडद्यामागील बाजू रंगभूमी सेवक संघ उत्तमरित्या सांभाळत आहे.
पुण्यातील पडद्यामागील कलाकारांसाठीही रंगभूमी सेवक संघाचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे कार्य बघून संस्थेस मदत देण्यात येत असल्याचे भाग्यश्री देसाई यांनी या प्रसंगी सांगितले. मदतीचा धनादेश सुरेंद्र गोखले, अरुण पोमण, महेंद्र कांबळे यांनी स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.