गोल्डन आय न्यूज नेटवर्क
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक एमएमसीसीच्या ‘सिनेमा’ एकांकिकेने पटकाविला !
रेवन एन्टरटेन्मेटची ‘असा ही एक कलावंत’ द्वितीय तर कलाकार मंडळी, पुणेची ‘चाहूल’ तृतीय !
पुणे : युवा सेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत एमएमसीसी, पुणेने सादर केलेल्या ‘सिनेमा’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला असून संघास 51 हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील रेवन एन्टरटेन्मेट संघाची ‘असा ही एक कलावंत’ ही एकांकिका द्वितीय आली तर कलाकार मंडळी, पुणेची ‘चाहूल’ ही एकांकिका तृतीय आली. या संघांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपये रोख, मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले.
युवा सेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील विजयी स्पर्धकांसमवेत मान्यवर.
युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी आणि युवा सेनेचे पुणे शहर चिटणीस कौस्तुभ कुलकर्णी यांच्या पुढाकारातून बालगंधर्व रंगमंदिरात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत 24 संघांनी एकांकिका सादर केल्या. आज (दि. 5) सायंकाळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, अभिनेते विजय पटवर्धन, राजू बावडेकर, परिक्षक संजय डोळे, अनुपमा कुलकर्णी, मंजुषा जोशी तसेच संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, युवा सेना पुणे शहरप्रमुख निलेश गिरमे, युवा सेना पुणे जिल्हाप्रमुख निलेश घारे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
विजय पटर्वधन म्हणाले, अशा स्पर्धांमधूनच कलावंत घडत असतात. नाटक ही कलाकाराच्या कामाची पहिली पायरी आहे. नाटकाद्वारेच कलाकाराचा रसिकांशी थेट संपर्क येतो आणि त्याला त्याच्या कामाची दादही लगेच मिळते.
परिक्षकांच्या वतीने बोलताना संजय डोळे म्हणाले, स्पर्धेत सादर झालेल्या 24 एकांकिकांपैकी सोळा ते सतरा एकांकिका दर्जेदार होत्या. स्पर्धेचे उत्कृष्टप्रकारे संयोजन केल्याबद्दल त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचेही कौतुक केले.
राज्यातील हौशी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, असे युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी यांनी या प्रसंगी नमूद केले. प्रास्ताविक कौस्तुभ कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले तर आभार सुनील महाजन यांनी मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
सांघिक प्रथम : सिनेमा (एमएमसीसी, पुणे)
सांघिक द्वितीय : असा ही एक कलावंत (रेवन एन्टरटेन्मेट)
सांघित तृतीय : चाहूल (कलाकार मंडळी, पुणे)
शिस्तबद्ध संध – रेवन एन्टरटेन्मेट
उत्कृष्ट प्रकाश योजना : संकेत पारखे, वेदिका कुलकर्णी (असाही एक कलावंत, रेवन एन्टरटेन्मेट)
उत्कृष्ट नेपथ्य : वृषभ भांडवे (नाव, तोडकं मोडकं संस्था)
उत्कृष्ट रंगभूषा : अभया देशमुख (विनाषलीला, नाट्यहोलिक क्रिएशन्स)
उत्कृष्ट वेशभूषा : तारा रकिबे (ड्रेनेज, इम्पीरिकल फाऊंडेशन, कल्याण)
उत्कृष्ट संगीत : मंदिर इंगळे, रविराज काळे (सिनेमा, एमएमसीसी, पुणे)
उत्कृष्ट अभिनेत्री : संचिता जोशी (आजी, चाहूल, कलाकार मंडळी, पुणे)
उत्कृष्ट अभिनेता : राघवेंद्र कुलकर्णी (असा ही एक कलावंत, रेवन एन्टरटेन्मेट)
उत्कृष्ट दिग्दर्शक : अभिप्राय कामठे (सिनेमा, एमएमसीसी, पुणे)
उत्कृष्ट लेखक : शिरीष कुलकर्णी (फेलसेफ, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे)
उल्लेखनीय अभिनय : स्वप्निल साळवी (मास्तर, तोडकं मोडकं), अथर्व धर्माधिकारी (बंट्या, भूताचे भविष्य), विष्णूदास महाजन (कलीपुरुष, विनाशलिला), स्नेहल शेडगे (म्हातारी, रवायत ए विरासत), श्रेयस जोशी (वडिल, सिनेमा), साईराज घाटपांडे (साई, मांदियाळी), इंद्रायणी दीक्षित (आत्याआजी, डिकरी डिकरी डॉग), पवन सागडे (अविनाश, पेन सलामत तो), प्रज्ञा चव्हाण (आई, ड्रेनेज), पायल जाधव (सरस्वती, राम महोमद सिं आझाद).
जाहिरात