गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विजय पटवर्धन फाउंडेशन आयोजित एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर –
कलाकार मंडळी, पुणेच्या ‘चाहूल’ने पटकाविला विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती करंडक , मुक्ताई फाउंडेशनची ‘स्किम’ द्वितीय तर एमएमसीसीची ‘सिनेमा’ तृतीय !
पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कलाकार मंडळी, पुणे यांनी सादर केलेल्या ‘चाहूल’ या एकांकिकेने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा करंडक आणि 25 हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले.
मुक्ताई फाउंडेशनेच्या ‘स्किम’ या एकांकिकेस द्वितीय क्रमांक आणि 20 हजारांचे पारितोषिक तर एम. एम. सी. सी.च्या ‘सिनेमा’ या एकांकिकेस तृतीय क्रमांक आणि 15 हजारांचे पारितोषिक मिळाले.
आनंद अभ्यंकर स्मृती प्रथम पुरस्कार श्रेयस जोशी (एम. एम. सी. सी) यांना तर विद्या भागवत स्मृती स्मृती पुरस्कार संचिता जोशी (कलाकार मंडळी, पुणे) यांना देण्यात आला.
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या कलाकार मंडळी, पुणे संघासमवेत विजय पटवर्धन, योगेश सोमण, मेघराजराजे भोसले, जयमाला इनामदार, सुनील गोडबोले, दीपक रेगे, मंजुषा जोशी, राजू बावडेकर , अभिजित इनामदार , योगेश जाधव आदी.
प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला ईनामदार, विजय पटवर्धन फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन, अभिजित इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपक रेगे, मंजुषा जोशी, राजू बावडेकर आणि राजेश कोलन यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.
विजय पटवर्धन फाऊंडेशनने गेल्या दोन वर्षांपासून सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा, प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा आणि निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा आयोजित करून नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
या स्पर्धांच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून अडचणीत सापडलेल्या कलाकारांना मदतीचा हात दिला जात असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन यांनी प्रास्ताविकात सांगितले.
विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती प्रथम पुरस्कार चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमांद्वारे आपल्या अभिनयातून रसिकांना मनसोक्त हसवून त्यांना हास्याच्या दुनियेत रममाण करणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांना पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष नेर्लेकर यांनी केले.
लेखन, दिग्दर्शन तसेच स्त्री आणि पुरुष कलाकारांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकास प्रत्येकी पाच, तीन आणि दोन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर तांत्रिक विभागासाठीही पारितोषिके देण्यात आली.
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या कलाकार मंडळी, पुणे संघासमवेत विजय पटवर्धन, योगेश सोमण, मेघराजराजे भोसले, जयमाला इनामदार, सुनील गोडबोले, दीपक रेगे, मंजुषा जोशी, राजू बावडेकर , अभिजित इनामदार , योगेश जाधव आदी.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
सांघिक प्रथम : प्रकाश इनामदार स्मृती करंडक : ‘चाहूल’, कलाकार मंडळी, पुणे,
द्वितीय : प्रदीप पटवर्धन स्मृती करंडक : ‘स्किम’, मुक्ताई फाउंडेशन,
तृतीय : ‘कै. सौ. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती करंडक : ‘सिनेमा’, एम.एम.सी.सी.
सांघिक उत्तेजनार्थ : क्रांतीवीर कला, क्रीडा मंडळ नाशिक (विठाबाईचा कावळा), स. प. महाविद्यालय (कृष्णपक्ष), आयडिअल कॉलनी (लाईफ अ जर्नी).
सर्वोत्कृष्ट नेपथ्य : श्रुती परांजपे (कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय). सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना : निखिल मारणे (चाहूल, कलाकार मंडळी).
सर्वोत्कृष्ट संगीत : सुजल गायकवाड (सिनेमा, एम.एम.सी.सी.).
सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम : अक्षय संत, विकार कांबळे (चाहूल, कलाकार मंडळी, पुणे), द्वितीय : मुकुल ढेकळे (स्किम, मुक्ताई फाउंडेशन), तृतीय : शिरीष कुलकर्णी (फेलसेफ, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड, पुणे)
सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनय प्रथम : संचिता जोशी (आजी, चाहूल, कलाकार मंडळी), द्वितीय : शिरीन बर्वे (बिंद्रा, कृष्णपक्ष स. प. महाविद्यालय), तृतीय : साक्षी परदेशी (अक्का, मायबाप, आय.एम.सी.सी.). उत्तेजनार्थ : वैष्णवी मुळे (राधा, सौभाग्यवती, रंगपंढरी पुणे), सायली हेंद्रे (अथर्वी, नातीचरामी, फ्रायडे फिल्म प्रॉडक्शन), प्रिया कुलकर्णी (कमा अत्या, हे गेले, न आणि ण पुणे)
सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय प्रथम : श्रेयस जोशी (वडील, सिनेमा, एम.एम.सी.सी.), द्वितीय : आयुष वाघ (आबा, थोडं तुझ थोडं माझं, एम.ई.एस. सिनियर कॉलेज), तृतीय : मॅडी शेख (मामा, स्किम, मुक्ताई फाउंडेशन, पुणे).
उत्तेजनार्थ : राज पाटील (अनिरुद्ध जोशी, फेलसेफ, मॉडर्न कॉलेज गणेशखिंड), अमेय बागड (नामू परिट, व्यक्ती आणि वल्ली, अतरंगी बॉईज), ऋजभ जैन (शेखर, मायबाप, आयएमसीसी पुणे).
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम : ब्रदिश कट्टी (चाहूल, कलाकार मंडळी, पुणे), द्वितीय श्रीनिधी झाडे, शिरीन बर्वे (कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय), तृतीय : श्रेयस जोशी (सिनेमा, एम.एम.सी.सी.)
विशेष लक्ष्यवेधी अभिनेता : सुनील सरकटे (जज, खटला, रंगफैज, औरंगाबाद). विशेष लक्ष्यवेधी अभिनेत्री : स्नेहल शेडगे (सुली, स्किम, मुक्ताई फौउंडेशन).
जाहिरात