गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंडित कंदलगांवकर यांच्या शिष्यांतर्फे शनिवारी ‘गुरू वंदना’ कार्यक्रम!!
पुणे : किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित राजेंद्र कंदलगांवकर यांच्या शिष्यांतर्फे शनिवार, दि. 2 सप्टेंबर रोजी ‘गुरू वंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सवाई गंधर्व स्मारक सभागृह, राहुल टॉकीज शेजारी, शिवाजीनगर येथे ‘गुरू वंदना’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 3 वाजता होणार आहे.
पंडित राजेंद्र कंदलगांवकर
सुरूवातीस पंडित राजेंद्र कंदलगांवकर यांच्या रवी फडके, हर्षद डोंगरे, अश्विनकुमार कुलकर्णी, सिद्धेश दसवडकर, निखिल पटवर्धन, आदित्य देवधर, कल्याणी शेट्ये तसेच इतर शिष्यांची गायन प्रस्तुती होणार आहे.
रात्री ८ वाजता गुरू पूजन होणार असून कार्यक्रमाचा समारोप पंडित कंदलगांवकर यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना गणेश तानवडे (तबला) आणि प्रविण कासलीकर (हार्मोनियम) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात