गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातल्या युवकांसाठी करिअरच्या उत्तम संधी -इंद्रजीत बागल!
यशस्वी संस्थेचे ‘यशोत्सव’ स्नेहसंमेलन व ‘यशोगाथा’ प्रकाशन उत्साहात संपन्न!!
पुणे : दिनांक : १५ ऑगस्ट २०२३ :कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातल्या युवकांसाठी करिअरच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिपादन आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक इंद्रजीत बागल यांनी व्यक्त केले.
यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘यशोत्सव’ स्नेहसंमेलनात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात यशस्वी संस्थेने केलेले काम कौतुकास्पद असून विविध औद्योगिक आस्थापनांनी यशस्वी संस्थेच्या ‘शिका आणि कमवा योजनेला दिलेला प्रतिसाद हा युवकांना आत्मनिर्भरतेचा मार्ग उपलब्ध करून देत आहे असेही इंद्रजीत बागल यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या परिविक्षा अधिकारी योगिता पाटील, यशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरे, संजय छत्रे, संचालिका स्मिता धुमाळ आणि संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी देविदास माळी व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित यशस्वी संस्थेच्या यशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
यावेळी आपल्या मनोगतात बोलताना पंडित जवाहरलाल नेहरूउद्योग केंद्र बालसुधारगृह येरवडाच्या परिविक्षा अधिकारी योगिता पाटील म्हणाल्या की,आमच्याकडे दाखल होणारी मुले ही साधारण वय वर्षे १४ ते १७ या वयोगटातील असतात, आयुष्यात हातून घडलेल्या एका चुकीच्या गोष्टीमुळे ही अल्पवयीन मुले समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावतात,’यशस्वी’ संस्थेच्या सहकार्याने आता या मुलानांही कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रसंगी यशस्वी संस्थेद्वारे विविध औद्योगिक कंपन्यांमधून शिका व कमवा आणि अप्रेन्टिस योजनेतील ऑन द जॉब ट्रेनिंग पूर्ण करून नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये ऑन रोल नोकरीची संधी प्राप्त झालेल्या तसेच ‘यशस्वी’ संस्थेतील स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधून कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करून उद्योजकतेचा मार्ग स्विकारलेल्या काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित यशस्वी संस्थेच्या यशोत्सव कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करताना ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी.
तसेच विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य असे विविध कलाप्रकार सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाशवी संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी देविदास माळी यांनी तर आभार प्रदर्शन यशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी दरंदले या विद्यार्थिनीने केले.सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमासाठी दिलीप पवार,अबिद शेख, ज्ञानेश्वर गोफण,राजेश कदम, ईशा फाटक, प्राची राऊत, शुभांगी कांबळे आदींनी विशेष सहकार्य केले.
जाहिरात