गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ऋत्विक फाउंडेशनतर्फे ‘मेलांज’अंतर्गत शनिवारी सांगीतिक मैफल.
पंडित आनंद भाटे यांचे गायन तर पंडित प्रवीण गोडखिंडी यांचे बासदीवादन!!
पुणे : ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे येत्या शनिवारी (दि. 12) ‘मेलांज’ या उपक्रमाअंतर्गत सुश्राव्य गायन-वादन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.गायन, वादन आणि नृत्य क्षेत्रातील प्रतिभावान कलाकारांच्या कलांचा संगम म्हणजे ‘मेलांज’ उपक्रम.
पंडित डॉ. प्रवीण गोडखिंडीश
निवारी होत असलेल्या कार्यक्रमात पंडित डॉ. प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन होणार असून त्यांना सत्यजित तळवलकर तबला साथ करणार आहेत. आनंदगंधर्व आनंद भाटे यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना भरत कामत (तबला), सुयोगकुंडलक(हार्मोनियम) आणि माऊली टाकळकर (टाळ) साथसंगत करणार आहेत.
पंडित आनंद भाटे
कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता ऋत्विक फाउंशडेन फॉर परफॉर्मिंग आर्टस्, प्लॉट नं. 17, वेद भवन मागे, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात