गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित पुरस्कार वितरण सोहळा रविवारी.
श्रीपाल सबनीस यांना जीवनगौरव तर ॲड. प्रमोद आडकर यांना धम्मभूषण पुरस्कार.
ॲड. जयदेव गायकवाड, उद्वव कानडे, पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. संभाजी मलघे यांचाही होणार गौरव.
पुणे : बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक बाबा भारती यांचा स्मृतिदिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी (दि. 13) आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांना बाबा भारती यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जीवनगौरव, ॲड. प्रमोद आडकर यांचा धम्मभूषण तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ॲड. जयदेव गायकवाड, कवी उद्धव कानडे, पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. संभाजी मलघे त्याचप्रमाणे डॉ. सुलक्षणा शिलवंत आणि चंद्रकांत कांबळे यांचा धम्मपद पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम दि. 13 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.
पुरस्काराचे वितरण डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी असणार आहेत. आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर हे प्रमुख पाहुणे आहेत.
जाहिरात