गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विजय पटवर्धन फाऊंडेशन तर्फे प्रकाश इनामदार स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन !
पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे प्रकाश इनामदार स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून स्पर्धा दि. 1 ते दि. 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत भरत नाट्य मंदिर, पुणे येथे होणार आहे.
विजय पटवर्धन फाऊंडेशनने गेल्या दोन वर्षांपासून सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा, प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा आणि निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा आयोजित करून नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून अडचणीत सापडलेल्या कलाकारांना मदतही उपलब्ध करून दिली आहे.
प्रकाश इनामदार स्मृती एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून जो निधी जमा होईल त्याचा विनियोग अडचणीत अडकलेल्या कलाकारांच्या मदतीसाठी केला जाणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास 25 हजार रुपये व करंडक, द्वितिय क्रमांकास 20 हजार रुपये व करंडक, तृतीय क्रमांकास 15 हजार रुपये व करंडक असे बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी नाममात्र 2 हजार 500 रुपये आहे. प्रवेश फी रोख किंवा चेकद्वारे भरता येणार आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणारा निधी कलाकारांच्या हितासाठीच वापरण्यात येणार आहे.
कलाकारांच्या अडचणीत त्यांना मैत्रीचा हात देण्यासाठी जास्तीत जास्त संस्थांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
अधिक माहितीसाठी विजय पटवर्धन (मो. 98222 52912), अभिजीत इनामदार (मो. 93296 89835) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा संयोजन समितीने केले आहे.
जाहिरात
जाहिरात